श्री. प्रसाद महेश लाड हे हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठाचे अध्यक्ष असून त्यांचे नेतृत्व हे प्रेरणादायी, सामाजिक भान असलेले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहे. ग्रामीण व शहर भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळाव्यात, शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता व्यवहारी, तंत्रस्नेही आणि मूल्याधारित असावे, असा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.

गावातील विद्यार्थ्यालाही जागतिक व्यासपीठ गाठता येते – फक्त योग्य दिशा, संधी आणि प्रेरणा आवश्यक आहे,” हा त्यांचा विश्वास विद्यापीठातील प्रत्येक उपक्रमातून उमटतो. समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेले असे नेतृत्व शिक्षणाच्या क्षेत्रात फारच दुर्मिळ आहे – आणि श्री. प्रसाद महेश लाड हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.

श्री. प्रसाद महेश लाड

श्री. कुशाल प्रमोद भापसे हे हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठाचे सचिव असून एक तरुण, ऊर्जावान आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व संस्थेला लाभले आहे. त्यांनी संस्थेच्या कार्यात आधुनिकतेची जोड देत शैक्षणिक गुणवत्ता, डिजिटल शिक्षण, व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. पारंपरिक मूल्ये आणि नवकल्पना यांचा समतोल साधत ते संस्था अधिक सक्षमपणे पुढे नेत आहेत.

श्री. कुशाल प्रमोद भापसे

श्रीमती सिमा बाबुराव भापसे - उप-अध्यक्षा
कार्यकारी मंडळ
श्री. विनोद रामभाऊ सूर्यवंशी - खजिनदार
श्रीमती निताताई प्रसाद लाड - सदस्य
श्रीमती कल्पनाताई विनोद सूर्यवंशी - सदस्य
श्रीमती संगीता प्रमोद भापसे - सदस्य

हुतात्मा बाबू गेनू विद्यापीठ

आमच्या संस्थेच्या नऊ विद्यालयांमध्ये एकूण 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि आतापर्यंत जवळपास 25 हजार विद्यार्थी या शिक्षण संस्थेच्या सर्व कॅम्पस मधून शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नाव उंचावत आहेत निश्चितच ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्यांचा तालुका म्हणून पाथर्डी तालुक्याची ओळख आहे आणि या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांची मुलं निश्चितच एक शिक्षणाच्या माध्यमातून एक आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारचं नाव कमवत आहेत

आमच्या शिक्षण संस्थेमार्फत दरवर्षी जवळपास गरीब 200 विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य शालेय साहित्य गणवेश याच वाटप करण्यात येतं

तसेच संस्थेने जवळपास 75 अनाथ अपंग मुलांना दत्तक घेतलेला असून त्यांचा बारावीपर्यंतचा सर्व शिक्षणाचा खर्च संस्थेमार्फत उचलला जातो

आपल्या शिक्षण संस्थेपुरतं मर्यादित न राहता आपल्याजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळा प्राथमिक विद्यालय ,माध्यमिक विद्यालय, या सर्व विद्यालयांमध्ये संस्थेमार्फत दरवर्षी शालेय साहित्य ,खेळाचे साहित्य व गणवेश यांचा वाटप करण्यात येते

संस्थेमार्फत सर्व विद्यालयांमध्ये खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळातून एक चांगला खेळाडू भविष्यामध्ये तयार व्हावा हा संस्थेचा मुख्य उद्देश असतो

संस्थेमार्फत सर्व विद्यालयांमध्ये जवळपास डिजिटल क्लासरूम करण्याचं एक ध्येय संस्थेने हाती घेतले असून सर्व विद्यालयांमध्ये एक दोन वर्ग आजपर्यंत डिजिटल झालेले आहेत

आमच्या शिक्षण संस्थेचे प्रायमरी स्कूल सेमी इंग्रजी माध्यम आज तालुक्यामध्ये एक नंबर क्रमांकाला अग्रेसर असून चांगल्या प्रकारची गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचं काम करते

संस्थेचा प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा मुलगा, मुलगी हे शिक्षणापासून वंचित न राहता शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात स्थान निर्माण करण्यासाठी गेले पाहिजेत त्या अनुषंगाने संस्था प्रामाणिक प्रयत्न करत असते

संस्थेमार्फत दरवर्षी झाडे लावा ,झाडे जगवा, पर्यावरण वाचवा ,पाण्याची बचत करा असे विविध उपक्रम राबवून एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रामाणिक प्रयत्न संस्थेचा असतो

संस्थेमार्फत मंथन ,स्कॉलरशिप ,प्रज्ञाशोध ,नवोदय स्पर्धा परीक्षा ,खेळाचे विविध स्पर्धा परीक्षा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा संस्थांतर्गत आयोजित करून मुलांना बक्षीस वितरण केले जाते

दरवर्षी संस्थेचे संस्थापक कै माजी आमदार बाबुरावजी भापसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध खेळाचे स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा विविध स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वितरण केले जाते व मिष्ठान्न भोजन सर्व विद्यार्थ्यांना दिलं जातं

हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठाने माझ्या मुलाला उत्कृष्ट शिक्षण दिले. त्यांच्या उपक्रमामुळे आमच्या कुटुंबाला खूप मदत झाली आहे.

सुरेश पाटील

★★★★★

शाखा कार्यालय पत्ता

शाखा कार्यालय , निंबोडी फाटा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर

कार्यलयीन वेळ

सोमवार ते शुक्रवार ९ ते ६

व्यासपीठ कार्यालय

कुणबी ज्ञातीभवन, संत झेवियर रोड, परळ, मुंबई - ४०००१२