









हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठ ट्रस्टचे उपक्रम
शैक्षणिक संस्था स्थापन करणे
बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आयटीआय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, व्यवस्थापन, कृषी व इतर व्यावसायिक महाविद्यालये स्थापन करणे व चालवणे.
पदवी, डिप्लोमा, नोकरीस अनुकूल व व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबवणे.
ग्रामीण व शहरी भागांतील तसेच अंध, दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे.
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, संगणक शिक्षण व डिजिटल शिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
आरोग्य सेवा
धर्मादाय रुग्णालय, आरोग्य केंद्रे चालवणे व मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे.
रुग्णवाहिका सेवा व गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवणे.
आरोग्य शिक्षण, जनजागृती शिबिरे, रक्तदान, नेत्रदान, योग केंद्रे सुरू करणे.
रोजगार निर्मिती
बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण व कौशल्यविकास कार्यक्रम राबवणे.
केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्य.
विद्यार्थी कल्याण व सर्वांगीण विकास
शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती, पुस्तकं, गणवेश व वसतिगृह सुविधा पुरवणे.
बालसंस्कार केंद्रे, अंगणवाडी, बुक बँक, ग्रंथालय, वाचनालय, जिम चालवणे.
खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व व्यक्तिमत्व विकास उपक्रम राबवणे.
महिला व बालकल्याण
महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण (मेहंदी, अगरबत्ती, हस्तकला, चॉक वगैरे) देणे.
बालसंवर्धन योजना, विधवांसाठी आश्रयगृह, अनाथ मुलांसाठी सुविधा, स्वयंपूर्णता योजनांची अंमलबजावणी.
सामाजिक कल्याण कार्ये
नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप, दुष्काळ) मध्ये मदत पुरवणे.
वृद्धांसाठी वृद्धाश्रम, अन्नछत्र व सहकार्य सेवा राबवणे.
स्वच्छता, हुंडा बंदी, पर्यावरण जागर, व्यसनमुक्ती, सामाजिक न्यायाबाबत जनजागृती.
पर्यावरण व कृषीविकास
सेंद्रिय शेती, पाणी व मृदसंवर्धन, अपारंपरिक ऊर्जा, शेतीशी संबंधित उद्योग यासाठी जनजागृती.
ठिबक सिंचन, गांडूळखत, वृक्ष लागवड, माती परीक्षण आदींसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण.
कायदेशीर व नागरी सेवा
जात प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आदींबाबत मार्गदर्शन व मदत.
कायदाविषयक जागरूकता शिबिरे व वाद निवारण समिती स्थापन करणे.
सांस्कृतिक व धार्मिक सहभाग
गाडगेबाबा जयंती, कीर्तन, प्रवचन, उपदेश, कार्यशाळा, सामूहिक विवाह यांचे आयोजन.
विविध जातधर्मीय एकतेस प्रोत्साहन देणारे कार्यक्रम.
सहकार्य व संलग्नता
भारतातील व परदेशातील विद्यापीठांशी सहकार्य करून शैक्षणिक कार्यक्रम व संशोधन प्रोत्साहित करणे.
